कोल्हापूर - साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शनिवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. सकाळी नऊच्या सुमारास घटस्थापना झाली. त्यानिमित्ताने तोफेची सलामी देण्याची परंपरा जपली गेली. उत्सवकाळात श्री अंबाबाईच्या नऊ दिवस नऊ सालंकृत पूजा बांधल्या जाणार आहेत. <br />बातमीदार - संभाजी गंडमाळे <br />व्हिडिओ - बी. डी. चेचर